बेळगाव जिल्ह्यमधील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असा मजकूर समाजमाध्यमात प्रसारित केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. समाजमाध्यमावर हा मजकूर पसरल्याने जमावाने शिक्षिकेच्या घरावर हल्ला चढवत घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. कर्नाटक पोलिसांनी तातडीने हालचाली करून संबंधित शिक्षिकेला अटक केली.

केंद्रीय राखीव पोलीस दलावर पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच शिवापूर येथील एका शिक्षिकेने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असा मजकूर व्हॉट्सअ‍ॅपद्वारा प्रसारित केला. याबाबत माहिती मिळताच जमावाने शिक्षिकेच्या घरावर चाल केली.

Story img Loader