कोल्हापूर : उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी गुरुवारी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. आपली भूमिका दोन दिवसात स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले. तथापि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिंदे सेनेमध्ये दोन दिवसात प्रवेश होणार असे संकेत मिळत आहेत.

जानेवारी महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्हा ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. या पदावर अठरा वर्षे राहिलेले जाधव यांना हा धक्का होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत जाधव यांनी सुषमा अंधारे, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी राजकीय डावपेच रचले. त्याचा परिणाम म्हणून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून कमी केले, असा आरोप केला होता.

nana patole, Vijay wadettiwar
महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी; पटोले, धानोरकर, वडेट्टीवारांना पक्षश्रेष्ठींकडून पाचारण
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Chhatrapati Shivaji Maharaj 100 feet tall statue in Malvan in Sindhudurg district
मालवणमध्ये शिवसृष्टी उभारावी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Sharad Pawar offer prayers at Lalbaugcha Raja
Sharad Pawar at Lalbaugcha Raja: शरद पवारांच्या श्रद्धेवर भाजपाकडून प्रश्नचिन्ह का? पवारांचे लालबागच्या राजाचे दर्शन वादात का?
Dhule Eknath shinde shivsena marathi news
धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका
amol kolhe on pm narendra modi
Amol Kolhe: “पुतळ्यानं स्वतःहूनच मान टाकली…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यानंतर डॉ. अमोल कोल्हेंची कवितेमधून प्रतिक्रिया
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
CM Ekanth Shinde
CM Eknath Shinde : “बंदच्या मागे महाराष्ट्रात काहीतरी अघटीत…”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर गंभीर आरोप; म्हणाले, “नवीन टीम बोलावून…”

हेही वाचा – कोल्हापुरात सराफांना दणका; बंगाली कारागिराने दीड किलो सोने लांबवले

ठाकरेसेनेने डावलले

यानंतर जवळपास दीड महिना झाला तरी पक्षाने जाधव यांची कोणतीही चौकशी केली नाही. तर जाधव हेसुद्धा पक्षापासून फटकून राहिले होते. आदित्य युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची पंधरा दिवसापूर्वी हुपरी या जाधव यांच्या शहरांमध्ये सभा झाली होती. तेव्हाही जाधव अनुपस्थित राहिले होते.

फुटिरांविरोधात आक्रमक

शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदे यांनी सवतासुभा केला होता. तेव्हा मुरलीधर जाधव हे आक्रमक झाले होते. त्यांनी जिल्ह्यातून फुटून शिवसेनेमध्ये गेलेले खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात मोहीम उघडून गद्दरांना धडा शिकवला पाहिजे, अशी भूमिका घेवून आंदोलने केली होती. आता मात्र त्यांनी ठाकरे सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शिंदे सेनेमध्ये सहभागी होण्याच्या प्रक्रियेत दिसत आहेत.

हेही वाचा – कोल्हापुरात सराफांना दणका; बंगाली कारागिराने दीड किलो सोने लांबवले

ठाकरेसेनेला धक्का

दरम्यान, जाधव यांचीही भूमिका ठाकरे सेनेला धक्का देणारी आहे. यानिमित्ताने ठाकरे सेनेचे पहिला जिल्हाप्रमुख शिंदे सेनेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.