कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखा परीक्षणाविरोधात दाखल केलेली संचालक मंडळाची याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे आताही चाचणी होणार असून त्यामधून काय उघडकीस येते याकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, संचालक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोकुळ दूध संघातील सण २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करावे अशी मागणी गोकुळच्या विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या लेखापरीक्षण मंडळाकडे केली होती. त्यावर या विभागाने अधिकारी नियुक्त केले होते. मात्र अशा पद्धतीने चाचणी लेखापरीक्षण करणार येणार नाही, असे गोकुळच्या संचालक मंडळाचे म्हणणे होते.

हेही वाचा >>>कोल्हापूर: चंदगड तालुक्याचे नाव झाले रामपूर ; तांत्रिक घोळाने प्रशासकीय काम खोळंबळे

राजकीय वाद

त्यावरून त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याबाबत शासनाने लागू केलेले आदेश हे नियमाला धरून असल्याचे सांगत गोकुळची संचालक मंडळाचे याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान गोकुळच्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण यावरून शौमिका महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात वाद रंगला होता. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निवडीवर आश्चर्य व्यक्त केले होते.