कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील ऊसाला एफआरपी शिवाय जादा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथे झालेली बैठक निष्फळ ठरली. हि रकम देण्यास साखर कारखानदारांनी नकार दिला. यामुळे या प्रश्न हंगामापूर्वी तापण्याची चिन्हे आहेत.
शेतकरी संघटनांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संधटनांची बैठक झाली. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक यांचेसह कारखान्याचे चेअरमन , कार्यकारी संचालक , साखर सहसंचालक अशोक गाडे , विविध संघटनांचे प्रतिनिधी ऊपस्थित होते.
हेही वाचा >>>कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीला विरोध करत १८ गावांमध्ये बंद; व्यवहार ठप्प
हिशोब पूर्ण करावा – जिल्हाधिकारी
वारवांर आंदोलने करून पैसे मिळत नसतील तर मोठा संघर्ष सुरू होईल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आतापर्यंत राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा जादा दर दिलेले आहेत. कोल्हापुरातील कारखाने सक्षम असून ऊस दर नियंत्रणाच्या मान्यतेची तांत्रिक अडचण सांगून दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप केला. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १५ सप्टेंबर पुर्वी हिशोब पुर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व कारखान्यांना दिला.
साखर कारखानदारांची पाठ
साखर कारखानदार दुसरा हप्ता न देण्याच्या ठाम भुमिकेत दिसले. दत्तचे गणपतराव पाटील, गुरुदत्तचे माधवराव घाटगे हे शिरोळतालुक्यातील अध्यक्ष वगळता इतर कारखानदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली.