लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप रविवारी तब्बल ५० दिवसाच्या आंदोलनानंतर संपुष्टात आला. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मध्यस्थी केली होती. यानंतर कामगारांनी मिरवणूक काढून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

इंडो काउंट इंडस्ट्रीज या खाजगी सूतगिरणीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. हे आंदोलन तापत चालले होते. कामगारांनी समरजित घाटगे यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यांनी व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर कामगारांच्या मागण्या मान्य होऊन आंदोलन आज मागे घेण्यात आले. ७ सप्टेंबर पासून कंपनी पूर्ववत सुरू होणार आहे.

आणखी वाचा-सकल मराठा समाजाची कोल्हापूर जिल्हाभर आंदोलने

यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक कमल मितरा म्हणाले, सामंजस्य करारानुसार कर्मचाऱ्यांना सर्वकाही देण्यात येईल. कामगारानी कंपनीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. घाटगे म्हणाले, यापुढे व्यवस्थापन आणि कामगार यांनी विश्वासाने आपले नाते जपावे. एकही दिवस कंपनी बंद नाही पडली पाहिजे याची दक्षता घ्यावी . काही बंदच पाडायचे असेल तर अदृश्यपणे होणारी खंडणी, एजंटगिरी या गोष्टी बंद पाडा.