कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आणखी एका त्यांच्याच जुन्यात सहकार्याने आव्हान दिले आहे. जय शिवराय शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी माने यांनी आगामी लोकसभा निवडणुकीला राजू शेट्टी यांच्या विरोधात आखाड्यात उतरण्याची घोषणा आज मेळाव्यात केली आहे. यापूर्वी राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच माजी आमदार उल्हास पाटील यांनीही राजकीय आव्हान दिले होते. पाठोपाठ आता माने यांनीही दंड थोपटले असल्याने आगामी लोकसभेचा सामना भलताच रंगणार असे दिसू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेठ वडगाव (ता.हातकणंगले) येथील शेतकरी संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. गुजरात येथील गणदेवी साखर कारखान्याचे संचालक रणजीतभाई पटेल, भीमराव पाटेल, भीमराव साठे, नितीन पाटील,बाळासाहेब पाटील,राजेंद्र सुतार, अनिल पाटील प्रमुख उपस्थितीत होते.यावेळी माने यांनी विद्यमान खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहे तर माजी खासदार चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आत्मक्लेष यात्रा काढत आहेत.हे दोन्ही आजी-माजी खासदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत यामुळेच देशाच्या सर्वोच्च सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्रतेने मांडण्यासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असल्याचे जाहीरपणे सांगितले.

हेही वाचा >>>कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शौर्य जागरण रथयात्रा ११ ऑक्टोबर पासून

माने पुढे म्हणाले, ऊसाला पाच हजार शंभर रुपये मिळावे यासाठी गेले चार महिने आम्ही संघर्ष करत आलो, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये याबाबत लोकप्रबोधन करण्याचं काम आम्ही केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील ८७१ तर सांगली जिल्ह्यातील ५६१ गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव घेऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतचे ठराव घेऊन देशाचे सहकार मंत्री व पंतप्रधान यांना पाठवणार आहे.

यावेळी गणदेवी साखर कारखान्याचे संचालक रणजीत भाई पटेल म्हणाले, आमच्या राज्यामध्ये जवळच्या एका साखर कारखाने विस्तारीकरण केले म्हणून आम्ही लगेच विस्तारित करण केले असे होत नाही एखादा छोटा कारखाना असेल तो कारखाना मोठ्या कारखान्यामध्येविलीनीकरण करून क्षमता वाढवावी हा आमचा हेतू असतो. मार्च अखेर गत हंगामात ३६७५ आम्ही ऊसाला दर दिला. यासाठी साखर उतारा साडेअकरा टक्के होता. साखर कारखान्याचे नियोजनही अत्यंत नेटकेपणाने झाले की उसाला दर सुद्धा चांगला दर देता येतो.दरम्यान विनय पब्लिकेशन प्रकाशित शिवाजी माने लिखित ‘तिढा शेती प्रश्नाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं.यावेळी यावेळी शामल सुतार, श्रावणी पाटील,या विद्यार्थ्यांची भाषण झाले.स्वागत सदाशिव कुलकर्णी यांनी केले.प्रस्ताविक शितल कांबळे यांनी केले.आभार शामसुंदर जायगुडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र खैरे यांनी केले.