विजयादशमी दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराचा त्रिशताब्दी सोहळा साजरा होत असून त्याचे औचित्य साधून भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी श्री महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवाच्या दुस-या माळेला साडेतीन किलो सोन्याची मोच्रेल आणि चवऱ्या देवस्थान समितीच्या बाळासाहेब जाधव आणि शुभांगी साठे यांच्याकडे सुपुर्द केल्या.
श्री महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने पाच महिन्यांपूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईला सुवर्ण पालखी प्रदान करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर गत पाच महिन्यांत ट्रस्टने भाविकांना केलेल्या आवाहनानुसार ११ किलो सोने जमले आहे. नवरात्रोत्सवाच्या आणि त्रिशताद्बीच्या औचित्याने खासदार धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक यांनी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या माध्यमातून साडेतीन किलो सोन्याच्या चवऱ्या आणि मोच्रेल देवस्थान समितीकडे सुपुर्द केले.
या वेळी सुवर्ण पालखी ट्रस्टचे कार्यवाह महेंद्र इनामदार, समीर शेख, दिगंबर इंगवले, शिवप्रसाद पाटील, के. रामाराव यांच्यासह देवस्थान समितीचे ज्येष्ठ सदस्य बाळासो जाधव, धनाजी जाधव, सचिव शुभांगी साठे, संगीता खाडे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

Story img Loader