कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची उद्या बुधवारी चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. जोतिबा डोंगरावर मंगळवार रात्रीपर्यंत तीन लाख भाविक दाखल झाले आहेत. चांगभलंच्या गजरात सासनकाठ्या दाखल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चैत्र यात्रेचा उद्या मुख्य दिवस आहे. जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल. पाच वाजता महाभिषेक महापूजा, तर १० वाजता धुपारती सोहळा होईल. हस्तनक्षत्रावर सांय ५.३० वाजता श्री. जोतिबाचा पालखी सोहळा निघेल. यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते.

हेही वाचा – कोल्हापूर: आर्थिक कारणातून हातकंणगले तालुक्यात युवकाचा खून; जिवलग मित्रांची आत्महत्या

भाविकांनी परिसर फुलला

मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या जोतिबावर दाखल झाल्या आहेत. चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे. बैलगाडी, खाजगी वाहनातून, पायी चालत भाविक डोंगरावर आले आहेत.

हेही वाचा – साताऱ्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने नागरिकांना मुखपट्टी वापरने बंधनकारक, दोन रुग्णांचा मृत्यू

सासनकाठ्या आकर्षण

दुपारी १२ वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होईल. पहिला मान निनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा असतो. मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतील. एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० ते ८० फुटांच्या उंच सासनकाठ्या सहभागी असतात.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three lakh devotees sasankathi entered for jyotiba yatra ssb