कोल्हापूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे . शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बांगलादेशातील हिंदू मंदिरे, हिंदू नागरिकांवर होत असलेले अत्याचार, कोलकाता येथील डॉक्टर महिलेची हत्या, तसेच निष्पाप मुलींचा क्रूर पद्धतीने लव्ह जिहादी बळी, संत-महंत रामनाथ गिरी यांच्या विरोधात आंदोलनावेळी केलेली शिवीगाळ याविरोधात सकल हिंदू समाजाकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
सकल हिंदू समाजाच्य आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर बंद झाले आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद राहिले. शाहूपुरी ,राजारामपुरी, लक्ष्मीपुरी या महत्त्वाच्या व्यापार पेटांसह महाद्वार रोड , दसरा चौक अशा प्रमुख ठिकाणची आस्थापने सकाळपासून बंद राहिली.
हेही वाचा : दोघा साधकांच्या आत्महत्येचे गूढ वाढले; शोध मोहीम राबवून दरीतून मृतदेह काढले
हिंदुत्ववादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. या ठिकाणी त्यांनी निदर्शने केली. आंदोलन करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून वाहनातून पकडून नेले. शहरात शांततेत बंद सुरू आहे. शिवसेना शिंदे गटासह विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.