राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सांगली दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत आष्टा नगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा सांगता समारंभ होणार आहे. याशिवाय सर्वोदय साखर कारखाना कार्यस्थळावर समाजवादी विचारवंत माजी आमदार व्यंकाप्पा पत्की यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते होणार आहे.
आष्टा नगरपालिकेच्या स्थापनेला तब्बल १६१ वष्रे झाली असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या मच्छी मार्केट इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी आष्टा नगरपालिकेच्या माजी अध्यक्षांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जयंत पाटील, पंतगराव कदम, सुमन पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आष्टा येथील कार्यक्रम झाल्यानंतर सर्वोदय कारखान्याचे संस्थापक व्यंकाप्पा पत्की यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण कारखाना कार्यस्थळावर पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास संभाजी पवार, शरद पाटील, युक्रांदचे कुमार सप्तर्षी उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार आज सांगली दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सांगली दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत आष्टा नगरपालिकेच्या वर्धापन दिनाचा सांगता समारंभ होणार आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 24-11-2015 at 01:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today sharad pawar sangli tour