कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना आपल्या दैनंदिन तक्रारी घरबसल्या निर्गत करणेसाठी ‘टोल फ्री’ सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाइलद्वारे ०२३१-१९१३ हा क्रमांक डायल करावा. या क्रमांकाद्वारे आपली तक्रार नोंदविण्यात येईल. त्यानंतर नोंदविलेली तक्रार संबंधित एसएमएसद्वारे नागरिकांना व कर्मचाऱ्यास प्राप्त होईल. प्राप्त तक्रारीचा आढावा घेऊन तक्रार २४ तासांत निर्गत करावी लागणार आहे. कर्मचाऱ्याने तक्रार वेळेत निर्गत केली नाही, तर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होईल. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास प्राप्त तक्रारीबाबत तत्काळ कार्यवाही ठेवणे आवश्यक राहणार आहे. नागरिकांनी या क्रमांकावर सार्वजनिक स्वच्छता, लाइट, पाणीपुरवठा, ड्रेनेज वगरे तक्रारी नोंदवाव्यात. वैयक्तिक अथवा दावा सुरू असलेल्या तक्रारी नोंदवू नयेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी १९१३ या क्रमांकाद्वारे नोंदवून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा