लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : फुलकोबी पिकाच्या (फ्लॉवर) दरात जबर घसरण झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने सोमवारी शेतात रोटावेटर चालवला. त्यामध्ये जनावरे चरण्यास सोडली. शिरोळ तालुक्यातील जिनेश्वर शंभूशेटे (नांदणी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. फुलकोबीचा दर एक तृतीयांश इतका कोसळल्याने हे पाऊल उचलण्याची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

जिनेश्वर शंभूशेटे हे गेली वीस वर्षे फुलकोबी पीक घेत आहेत. दर चांगला मिळत असल्याने हेच पीक घेण्याकडे त्यांचा कल राहिला. त्यांनी दीड एकर क्षेत्रात दोन महिन्यांपूर्वी वर्षा या जातीच्या फुलकोबीची पेरणी केली होती. पीक चांगले आले होते. त्यांनी बाजारात फुलकोबी विकण्यासाठी नेले असता वाईट अनुभव आला.

आणखी वाचा-महामस्तकाभिषेक महोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार

फुलकोबीच्या १२ गड्ड्यांना ५० ते ७० रुपये इतका अत्यल्प दर मिळाला. पूर्वी हा दर १५० ते २५० रुपये असा मिळत होता. आजवरच्या फुलकोबी विक्रीत हा सर्वात नीचांकी दर मिळत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

फुलकोबी पिकवण्याचा खर्च, ते शेतातून काढणे, पोतीविकत घेऊन त्यात भरणे, वाहन खर्च हे करूनही हाती काहीच पैसे राहत नाहीत. यामुळे शेतामध्ये रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. शेतामध्ये जनावरांना चरण्यासाठी सोडले असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-काम जमत नसेल तर स्वेच्छानिवृत्ती घ्या; मंत्री मुश्रीफ यांचा कोल्हापुरात अधिष्ठात्यांना सल्ला

असा असणार बंदोबस्त

एक अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, ४६ पोलीस निरीक्षक, १५४ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १५२० पोलीस अंमलदार, एक जलदगती पथक, पाच राज्य राखीव पोलीस दलाची पथके, आठ स्ट्रायकिंग दल आणि ७० वॉर्डन असा १८१९ पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. नववर्ष साजरे करताना सर्वांनी वाहतूक आणि सामाजिक नियमांचे पालन करावे. नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tractors were used in kolhapur to destroy entire flower crop due to falling prices mrj