कोल्हापूर : पहिल्याच पावसाने कोल्हापूर-कोकण जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात दरड कोसळली. यामुळे सुमारे २४ तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने शर्तीचे प्रयत्न करून कोसळलेल्या दरडीचा भाग दूर केला. शुक्रवारी सायंकाळ पासून हलकी वाहने या मार्गाने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर-कोकण जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड काल सायंकाळी कोसळला होती. तेव्हापासून या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती निवारण पथक यांनी कोसळलेल्या भाग दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. जेसीबी यंत्राकरवी मोठमोठे दगड दूर करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते.
मोटारींची वाहतूक सुरू
मोठमोठे दगड दूर करण्याला यश मिळाल्यानंतर दुपारनंतर दुचाकी वाहतूक सुरू झाली होती. तर त्यानंतर कोसळलेल्या सर्व भाग दूर करून साफसफाई करण्यात आली. सायंकाळनंतर या मार्गावरून मोटारीची वाहतूक सुरू झाली. अद्याप ट्रक, बस अशी अवजड वाहतूक सुरू झालेली नाही. ती उद्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.