कोल्हापूर : गेले पाच दिवस बंद असलेल्या फोंडा घाटातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने शनिवारी सकाळपासून घाटातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. याबाबतचा आदेश सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी काढला आहे. मार्ग खुला झाल्याने अवजड वाहनधारकांनी आनंद व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवगड- निपाणी राज्य महामार्गावर फोंडा घाटात मोरीतील पाइप खचून रस्त्याच्या पृष्ठभागावर मोठा खड्डा निर्माण झाला होता. यामुळे या मार्गावर पाच दिवसापूर्वी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कोल्हापूर कोकण मार्गे येथून होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता.

हेही वाचा…कोल्हापूर : गगनबावडा परिसरात दोन दुर्मिळ सापांचा आढळ

एकेरी वाहतूक करून काम करणे शक्य नसल्याने काही दिवस अवजड वाहनांना या घाटातून वाहतुकीस बंदी होती. त्यामुळे हजारो वाहने या महामार्गावर थांबली होती. वाहतूक सुरू झाल्याचा आदेश आल्याने अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून यामा या मार्गावर आज वाहनांची पडताळ दिसत होती.