कोल्हापूर : मद्य प्राशन करताना दोघा मद्यपी मित्रांमध्ये भांडण होऊन रागातून गळा दाबल्याने एकाचा मृत्यू झाला. मित्राने मित्राचा खून केल्याचा प्रकार रविवारी पहाटे येथील उच्चभ्रू वसाहतीत घडला. दिनेश अशोक सोलापूरकर ( वय ३४, रा. गारगोटी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सन्मेष अशोक तेंडुलकर (वय ५४, रा. राजारामपुरी याला रविवारी ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिनेश व सन्मेष हे दोघे जिवलग मित्र आहेत. दोघेही काही कामधंदा करीत नाहीत. दिनेश हा अलीकडे गारगोटी येथे राहण्यास गेला आहे. गेल्या तीन दिवसापासून तो सन्मेष याच्या राजारामपुरी येथील सदनिकेमध्ये राहत होता.

हेही वाचा…इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी टोळी विरोधात मोक्का कारवाई

दोघेही मद्यपी होते. शनिवारी रात्री दोघे उशिरापर्यंत मद्यप्राशन करीत होते. अशातच दोघांमध्ये वाद झाला. सन्मेष याने दिनेशला शिवीगाळ करून मारहाण केली. रागाच्या भरात सन्मेष याने काखेत हात घालून मान दाबल्याने दिनेश याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संगमेश तेंडुलकर यांना ताब्यात घेतले आहे. सुजाता अशोक सोलापूरकर यांनी राजाराम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.