कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता नदी, ओढ्यातील पाणी रस्त्यावर पसरू लागले आहे. परिणामी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. ५ मार्गावरील ६ ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे बुधवारी सांगण्यात आले. पर्याय ठिकाणी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाणलोट भागात पावसाची संततदार कायम असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. धरणातील विसर्ग आणि नदी, ओढ्यात वाढणारे पाणी यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आवक घटल्याने मुंबईत टोमॅटोचे दरशतक

शाहू नाका – शिंगणापूर, चंदगड- हिडनगाव, चिंचवड खिद्रापूर मार्गावर दोन ठिकाणी, बुडवले – हलकर्णी तसेच नवले – देव कांडगाव आजरा या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे.दोन राज्य मार्गावर दोन ठिकाणी तर तीन जिल्हा मार्गावर चार ठिकाणी वाहतूक बंद आहे. पर्यायी ठिकाणाहून वाहतूक सुरू आहे. पाणी पातळी वाढत असल्याने एकूण २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी झाली आहे. अशा पाण्यात मंदिरे, दीपस्तंभ पाण्याखाली गेले आहेत. त्यावरून मुले पाण्याच्या प्रवाहात उड्या  मारत असून हा धोकादायक प्रकार रोख्गण्याची मागणी होत आहे. राजाराम बंधारा येथे बुधवारी सायंकाळी २७ फूट पाणी होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transport system in kolhapur district affected due to heavy rain zws
Show comments