करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात गाभारा प्रवेशावेळी मारहाण करणाऱ्या अन्य लोकांना अटक करण्याच्या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी तृप्ती देसाई यांच्यासह १८ समर्थकांना अटक केली. पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांचे निलंबन करून अन्य लोकांना अटक करावी या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये आंदोलनाचा इशारा देसाई यांनी यावेळी दिला. याचप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिरात गाभारा प्रवेशासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना १३ एप्रिल रोजी मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी श्रीपूजकांसह ७ जणांना अटक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा