कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. माजी आमदार के. पी. पाटील आणि अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. हे दोन्ही नेते शरद पवार गटांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील तसेच उद्योजक शिरीष सप्रे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान, पवार यांचा मुक्काम पंचशील हॉटेल येथे आहे. येथे त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार उपस्थित होते. याचवेळी अजित पवार गटाचे माजी आमदार. बिद्री साखर कारखान्याचे के. पी. पाटील यांनी पवार यांची भेट घेतली. पाटील यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याचवेळी ए. वाय. पाटील यांनीही पवार यांची भेट घेतली.

हेही वाचा – सोलापूर : स्टेट बँकेतील नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला आठ लाखांचा गंडा, जालन्याच्या दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – “अडीच वर्ष सरकारला बहिणी आठवल्या नाहीत का?”, लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला

हा संदर्भ घेऊन पत्रकारांनी दोन्ही पाटील तुमच्या पक्षासोबत आहेत का अशी विचारणा केली. त्यावर पवार यांनी दोन्हीही नेते आमच्या बरोबर आहेत, असा निर्वाळा दिला. त्यामुळे मेहुण्या- पाहुण्यांमधील कटूता शरद पवार गटात गेल्यानंतर तरी थांबणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two big leaders of ajit pawar group meet with sharad pawar excitement in kolhapur ssb