निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयावर आक्षेप घेत खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग, शिंदे गट तसेच भाजपावर गंभीर आरोप केले होते. शिवसेना पक्षनाव आणि चिन्हासाठी २ हजार कोटींचा व्यवहार झाला, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या आरोपाकडे आम्ही मनोरंजन म्हणून बघतो, अशी खोचक टीका त्यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलता होते.

हेही वाचा- “…म्हणून भरत गोगावलेंची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर”, कपिल सिब्बलांचा कोर्टासमोर युक्तिवाद; शिंदे गटावर तीव्र आक्षेप!

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

काय म्हणाले उदय सामंत?

संजय राऊत रोज सकाळी आरोप करतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही त्यांच्या आरोपाकडे मनोरंजन म्हणून बघतो, अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केला. तसेच काल शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेची शिस्तभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे नेतृत्व मंत्री दादा भुसे करत आहेत. जर कोणी पक्षाच्या विरोधात कारवाई केली, तर ते प्रकरण शिस्तभंग समितीकडे जाईल, असा सुचक इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – पक्ष किती महत्त्वाचा? सिंघवींनी सर्वोच्च न्यायालयात दिलं लोकपाल विधेयकाचं उदाहरण, म्हणाले…

महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि आताची शिवसेना वेगळी आहे. यामध्ये निवडणूक आयोगानेच बदल केले आहेत. त्यांनी आम्हाला चिन्ह आणि नाव दिलं आहे. आता एकच शिवसेना आहे आणि आमची युती भाजपाबरोबर युती आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “वहिनींनी कळत-नकळत…”, शिवसेना फुटण्याचे कारण सांगतांना भरत गोगावले यांनी केला खळबळजनक आरोप

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावरून सामंत यांनी राजू शेट्टी यांनाही टोला लगावला. एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठमोठ्या नेत्यांचा येण्याचा ओघ वाढला आहे. आपण त्या नेत्यांमध्ये नाही, हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांना अशी आंदोलनही करावी लागत आहेत, असे ते म्हणाले.

Story img Loader