कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी कोणाला याचा पेच संपुष्टात आला आहे. आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची उमेदवारी जाहीर केली. शाहूवाडी -पन्हाळासह लोकसभा मतदारसंघातील अन्य मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले आहे. या लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेनेकडे हा मतदारसंघ होता.

शेट्टींची गट्टी जमली नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. मात्र ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडणुकीला उभे राहावे अशी अट घातली होती. ती शेट्टी यांना मान्य नव्हती. त्यामुळे मातोश्री आणि शेट्टी यांचे बिनसले.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान

हेही वाचा – राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती

सरूडकरांना संधी

याचवेळी शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व हातकणंगलेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर आज ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती उमेदवारीची मशाल देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – औरंगाबादमध्ये एमआयएमच्या विरोधात वंचितचा मुस्लीम उमेदवार, मतविभाजनाचा आणखी एक प्रयोग

कोण आहेत सत्यजित पाटील?

शाहूवाडी तालुक्यात सरूडकर पाटील घराण्याचा मोठा प्रभाव आहे. बाबासाहेब पाटील सरूडकर हे या मतदारसंघात दोन वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी माजी आमदार संजय सिंह गायकवाड यांचा पराभव केला होता. तर गायकवाडही या मतदारसंघात पाटील यांना हरवून दोन वेळा विजयी झाले होते. बाबासाहेब पाटील सरूडकर हे शिराळा तालुक्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे गेली २५ वर्षे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा राजकीय वारसा सत्यजित पाटील सरूडकर हे चालवत आहेत. त्यांनी सर्वप्रथम मानसिंग गायकवाड व करण गायकवाड यांचा पराभव करून विधानसभा निवडणुकीत पहिला विजय मिळवला होता. तर २०१४ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी मंत्री विनय कोरे यांचा पराभव केला होता. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली असताना ठाकरे यांनी त्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवले आहे.