कोल्हापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीला कोल्हापुरातून उमेदवार निवडून दिले होते. आता ते गद्दार झाले आहेत. त्या गद्दारांचा सूड घ्यायला कोल्हापुरात आलो आहे, अशी टीका करून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी हा सूड घ्यायला कोल्हापूरकरांनी मदत करावी, असे म्हणत संजय मंडलिक व धैर्यशील माने या खासदारांचे नाव न घेता कोल्हापुरातील सभेत टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथल्ला, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भव्य जाहीर सभा रात्री मैदानात पार पडली.

आणखी वाचा-काँग्रेसला मत देणे म्हणजे पाप; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सुरत मधील दोघेजण देश चालवत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले आहेत. इलन मास्क हे हुशार निघाले. त्यांचा उद्योग गुजरात मध्ये पळवण्याचा डाव होता. मात्र लोकसभा निवडणूक होईपर्यंत ते थांबले आहेत. त्यांनाही माहित झाले आहे की लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार जाणार आणि इंडिया आघाडीचे सरकार येणार. नवे सरकार आले की आम्ही उद्योजकांना चांगल्या सुविधा पुरवू. जीएसटीच्या दहशतवादातून उद्योगाला मुक्त केले जाईल. उद्योगाची परिपूर्ण वाढ होण्यासाठी नवे सरकार कटीबद्ध असेल.

या देशात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आणि मोदींचे सरकार आणि मिंदे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. याच शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार निश्चितपणे करून दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-ठाकरेसेनेच्या कोल्हापूर जिल्हा उपप्रमुखपदी महेश बोहरा; महादेव गौड पदमुक्त केल्याची पक्षाची घोषणा

ठाकरे म्हणाले, शिवसेनेने भाजपला खांद्यावर घेवून महाराष्ट्र दाखविला.  अन्यथा त्यांना खांदा द्यायला कोणी मिळाले नसते. गेल्या विधान सभा निवडणूकीत भाजपने पाडापाडीचे राजकारण केले. त्याचा सूड घेण्यासाठी मी आलो आहे. संघर्ष करीत मुंबई घेतली. पण भाजप मुंबईचे महत्व कमी करीत आहेत. सर्व उद्योग व गद्दारही गुजरातला गेले. सध्या मोदी नाही तर गजनी सरकार आहे. त्यांना काल काय केले ते आज आठवत नाही. सध्या ते भटकती आत्मा काढत आहेत. त्यांनी त्याचा गुजरातमध्ये शोध घ्यावा. एकिकडे शेतक-यांवर प्रेम असल्याचा आव आणला जातो, आणी दुसरीकडे शेतक-यांच्या विरोधात काळे कायदे का आणले होते. याविरोधातील आंदोलनात अनेक शेतक-यांचा बळी गेला. भटकती आत्मा शोधण्यापेक्षा त्या शेतक-यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल, याचा विचार करावा.