कोल्हापूर : येथील हिंदू महिलांनी मुस्लीम महिलांसाठी इफ्तार मेजवानीचे आयोजन केले होते. खजूर, समोसा व पाणी देऊन रोजा सोडल्यानंतर नमाज पढून या महिलांनी हिंदू महिलांसोबत मेजवानीचा आनंद घेतला. स्त्रियांनी स्त्रियांसाठी आयोजित केलेली हि पाहली इफ्तार मेजवानी ठरली. आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी आम्हा मुस्लीम स्त्रियांना रोजा सोडण्यासाठी इफ्तारचे आयोजन केल्यामुळे भरून पावलो आहोत, अशी समाधानाची भावना रेश्मा मुजावर, शगुफ्ता अत्तार, यास्मिन देसाई, शाहीन अत्तार, रासिका मुल्ला, तबस्सुम मलाडी, बेनझीर जमादार आदींनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीच्या ताकदीवर निवडून येणार; सत्यजित पाटील सरूडकर यांना विश्वास

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nikhil rajeshirke wedding ritual begins
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Batoge To Katoge wedding card viral
हद्दच झाली! लग्नाच्या पत्रिकेवरही आता ‘बटोगे तो कटोगे’चा नारा; व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत मोदी-योगींचा फोटो
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कोल्हापुर शहराला छ. शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहूंच्या सर्वसमावेशक विचारांचा, धार्मिक सलोख्याचा वारसा आहे. परंतु  काही काळापूर्वी कोल्हापुरातील बहुसांस्कृतिक वातावरणास छेद देऊन विविध धार्मिक समूहांत तेढ, हिंसा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी येथील पुरोगामी विचारांच्या महिलांनी अल्पसंख्यांक मुस्लीम समूहातील स्त्रियांशी संवाद साधण्याचा, त्यांचे भय दूर करण्याचा प्रयत्न केला. देशात मुस्लीम, ख्रिश्चन, पुरोगामी विचाराचे लोकांवर हल्ले सुरु आहेत. धर्मनिरपेक्ष संविधान आणि बहुसांस्कृतिकता नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘शांतीसाठी स्त्री-संघर्ष’ या मंचाची स्थापना करण्यात आली. या मंचाद्वारे कोल्हापुरातील पुरोगामी, ख्रिश्चन शैक्षणिक संस्था, मुस्लीम शिक्षिकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न झाले. तेव्हा मंचाने सत्यशोधन करून त्यातील राजकीय हेतू स्पष्ट करणारा अहवाल जाहीर केला. तसेच विविधधर्मीय महिलांच्यात प्रेम, सद्भावना व विश्वास निर्माण करण्यासाठी यापूर्वी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये अनेक महिलांनी दिवाळीत मुस्लीम महिलांसोबत फराळाचा आनंद लुटला. तर आता मुस्लीम महिलांसाठी इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले. खजूर, समोसा व पाणी देऊन ‘रोजा’ सोडल्यानंतर नमाज पढून या महिलांनी हिंदू महिलांसोबत मेजवानीचा आनंद घेतला. या कार्यक्रमास सर्व जातीधर्म समूहातील मुले व महिला सहभागी झाल्या. विश्वाला शांतीचा आणि सलोख्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम खूप आनंदाने पार पडला.

हेही वाचा >>> राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

महिलांसाठी पहिलीच मेजवानी

मुस्लीम समुदायातील इफ्तार मेजवानी सुद्धा बहुधा पुरुषांसाठीच आयोजित केली जाते. परंतु उपवास आणि उपासनेत संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणाऱ्या स्त्रिया केवळ कष्ट उपसत राहतात. त्यांना प्रेम व समाधान देण्याचा प्रयत्न करणे हा स्त्रियांनी स्त्रियांसाठी आयोजित केलेल्या या इफ्तार मेजवानीचा उद्देश होता. यांचा पुढाकार या कार्यक्रमाच्या आयोजनात ‘शांतीसाठी स्त्री-संघर्ष’ मंचाच्या मीना शेषू, रेहाना मुरसल, भारती पोवार, मेघा पानसरे, तनुजा शिपुरकर, मंजुश्री पवार, सीमा पाटील, भारती पाटील, मनीषा रानमाळे, दीपा शिपुरकर, अनुराधा भोसले, गीता हसुरकर, सरलाताई पाटील, मनीषा ब्रहस्पती, अनुराधा गायकवाड, मीना पोतदार  यांनी सहभाग घेतला.