कोल्हापूर : एका दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कोल्हापूर शहराला झोडपले. ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला होता. काल मात्र पावसाची उसंत होती. वातावरणात सतत बदल जाणवत आहे. आज सकाळपासून उन्हाची तिरीप जाणवत होती. दुपारी उकाडा वाढला. सायंकाळी चारनंतर पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण शहराला पावसाने झोडपले. पावसामुळे फेरीविक्रेत्यांची धावपळ उडाली. जिल्ह्याच्या काही भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा – छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
शेतीला फटका
मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी, हरभरा, मका, करडई याची काढणी असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे. उसासाठी मात्र हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.