कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाला मागील दोन वर्षे गळती सुरू आहे. सध्या प्रतिसेकंद २७७ लिटर इतके पाणी वाया जात आहे. गळती थांबवण्यासाठी यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ऐन उन्हाळ्यात याचा संपूर्ण जिल्ह्यावर ताण पडू शकतो. त्यामुळे शासनाने ही गळती थांबवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. गळती तपासावी लागेल. जलसंपदा विभागाला याबाबत निर्देश देऊ, अशी ग्वाही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Chhagan Bhujbal Samta Parishad Baithak : छगन भुजबळ यांचं आक्रमक भाषण “कभी ना डर लगा मुझे फासला देखकर…”

हेही वाचा – Deepak Kesarkar : “…तर शिवसेनेचे दोन भाग झालेच नसते”, ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या काळम्मावाडी (ता.राधानगरी) येथील धरणातून राधानगरी, कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ, भुदगरडमधील १२१ गावांमधील ४६ हजार हेक्टर क्षेत्राला याच धरणातून पाणीपुरवठा होतो. कोल्हापूर शहराला याच धरणातून पिण्यासाठी पाणी दिले जाते. या धरणाची २५.३९ टीमएसी इतकी क्षमता असून धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी निविदा प्रक्रिया झाली नसल्याने काम थांबले आहे. ही गळती वाढल्याने आमदार पाटील यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला.