कोल्हापूर: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे सोमवारी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांची अभिनयाची कारकीर्द नाटकातून सुरू झाली. देश बंधू संगीत मंडळी च्या नाटकात त्यांनी अभिनय साकारला होता.
आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. मोहित्याची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, मर्दानी, बाई मोठी भाग्याची अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्यातचे ठरवले होते, असे त्या नेहमी सांगत असत.