कोल्हापूर : राज्यातील कोट्यावधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या धोरणाचा फटका बसू लागला आहे. शेतकऱ्यांच्या प्रति आंधळे प्रेम दाखवून आपण शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात. मात्र हाच शेतकरी तुम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्ही शेतकऱ्यांच्या वर केलेल्या प्रत्येक वर्मी घावाची तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे, असे परखड भाष्य करणारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ आज भलताच चर्चेत आला आहे.   

महिला दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हातकनंगले तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. या प्रकरणी स्वाभिमानीच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना पोलीस कोटी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. 

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

हेही वाचा >>> अंबाबाई मंदिरातील मनिकर्निका कुंड, गरुड मंडप व नगारखाना इमारतीच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये खर्चाला राज्य शासनाची मान्यता

एकनाथ शिंदे साहेब माझं काय चुकलं, असा सवाल करून त्यामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी हेरवाड तालुका शिरोळ येथील एक तरुण ऊस उत्पादक शेतकरी आहे.गतवर्षी माझा १८४ ऊस कारखान्याला गाळप झाला आहे.हाडाची काढ आणि रक्ताची पाणी करून नैसर्गिक आपत्ती आसमानी व सुलतानी संकटे यांना तोंड देत आम्ही दिवस रात्र रानात राबत असतो .गेल्या वर्षी पासून साखर, इथेनॉल, बग्यास ,मोलसिस या पदार्थांना चांगला दर मिळाला आहे .यामुळे कारखान्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पैसे आले आहेत.शेतकऱ्यांना एफ आर पी देऊन कारखान्यांच्या कडे पैसे शिल्लक राहिले म्हणून आम्ही चारशे रुपये च्या दुसऱ्या हप्त्यासाठी तीन महिने कारखानदारांशी लढा उभारला .पायाला फोड येईपर्यंत जखमा होईपर्यंत आम्ही पदयात्रा काढल्या .पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नऊ तास रोखून धरला.यानंतर आपण स्वतः या आंदोलनात मध्यस्थी केलात व आपल्या यशस्वी मध्यस्थीनंतर गतवर्षी तुटलेल्या ऊसाला शंभर रुपये दुसरा हप्ता देण्याचा तोडगा मान्य होऊन आंदोलन समाप्त झाले.कारखानदारांनी दोन महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर रुपयाचा दुसरा हप्ता वर्ग करण्याची लेखी आदेश आपल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी दिले .जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी त्याप्रमाणे शंभर रुपयाचा दुसरा हप्ता देण्याचा प्रस्ताव आपल्या राज्य शासनाकडे सादर केला.जवळपास दोन महिने होऊन गेले आपल्याकडे या प्रस्तावांना मान्यता देण्यास वेळ नाही.या दोन महिन्यात तीन वेळा उपमुख्यमंत्र्यांना तीन वेळा तुम्हाला व चार वेळेला राज्याचे मुख्य सचिव यांना भेटून या प्रस्तावांना मान्यता देण्याची विनंती केली .मात्र आपल्याकडून याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही.   

हेही वाचा >>> कोल्हापूर : पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून अंबाबाई मूर्तीची पाहणी; न्यायालयात अहवाल देणार

यामुळे संतापून मी आपल्याला चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना काळे झेंडे दाखवले.यात आमचं काय चुकलं. आपण मात्र लगेचच काळ झेंडे दाखवलेली गोष्ट इतकी मनाला लागली की पोलिस यंत्रणेवर दबाव टाकत तुम्ही आम्हाला चार दिवसाची पोलीस कोठडी दिला.पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही माझ्या सहकाऱ्यांना काळे निळे होईपर्यंत  मारहाण करण्यास भाग पाडले.        

स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे आपण मानसपुत्र म्हणून घेता मात्र ज्यावेळेस सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असत तेव्हा आनंद दिघे साहेब त्यांना न्याय देऊनच थांबायचे.प्रसंगी त्यांनी पोलिसांनाही अंगावर घेऊन सामान्यांना न्याय दिला.आपण मात्र याच पदाचा गैरवापर करत शेतकऱ्यांना घामाचे दाम देणे ऐवजी  त्यांच्यावर वर्मीघाव केले हे पाप आपण कुठे फेडाल.ऑक्टोंबर २०२२ सालामध्ये आपण एक रकमी एफ आर पी देण्याचा कायदा पूर्ववत करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला मात्र आज अखेर कारखानदारांच्या दबावामुळे तुम्ही त्या फाईलवर सही करू शकला नाही .राज्यातील कोट्यावधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसू लागला आहे शेतकऱ्यांच्या प्रति आंधळे प्रेम दाखवून आपण शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात .मात्र हाच शेतकरी तुम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या वर केलेल्या  प्रत्येक वर्मीघावाची तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे हे मात्र निश्चित, असे या व्हिडिओमध्ये आंदोलनकर्त्याने  म्हटले आहे.

Story img Loader