अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी राबवल जाईल, असा विश्वास पॅनेलप्रमुख विजय कोंडके यांनी येथे  सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. आपल्यावरील गैरव्यवहाराचे आरोप त्यांनी या वेळी फेटाळले. त्याचबरोबर प्रत्येक निर्णय सभासदांच्या हिताचा घेऊन तो जलद राबवण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर भ्रष्टाचाराला संपूर्ण आळा बसावा यासाठी अंतर्गत हिशेबनिसाची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या आघाडीच्या कार्यप्रणालीविषयी कोंडके म्हणाले, की कोल्हापुरातील चित्रनगरीत लवकरात लवकर चित्रपटांचे चित्रीकरण सुरू व्हावे, कामगार आणि तंत्रज्ञांना काम मिळावे यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. आíथकदृष्ट्या सभासदांना मानधन मिळण्यासाठी शासनाकडे सर्व पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत. कामगारांना इन्शुरन्स पॉलिसी, निर्मात्यांना अनुदानाचे काम, सभासदांना ७ दिवसांच्या आत ओळखपत्र देण्याची व्यवस्था, निर्मात्यांना एनओसी आणि टायटलची कागदपत्रे तत्काळ देणे, निर्मिती संस्थेचे अर्ज भरण्याचे काम अत्यंत सुरळीत करण्यात येणार असल्याचे कोंडके यांनी सांगितले.  टायटल रजिस्ट्रेशन, सेन्सॉर प्रमाणपत्र, ओळखपत्राकरिता सभासदांना लाच द्यावी लागते. यावर तत्काळ कारवाई करणार आहे. महामंडळाचे ऑफिस कार्पोरेट व सर्व यंत्रणांनी सुसज्य केले जाणार आहे. फीचे पसे चेकने, डिमांड ड्राफ्टने व आरटीजीएस ने घेऊन बँक अकाऊंट राष्ट्रीय बँकेतच उघडले जाणार आहे. असे अनेक चांगले निर्णय आपल्या पँनलच्या अंजेड्यात घेतले असून या निर्णयाचे स्वागत सर्व सभासद नक्कीच करतील.  आपल्या सर्व उमेदवारांना शंका नाही, असे त्यांनी मत व्यक्त केले.  या पत्रकार परिषदेस पॅनेलमधील उमेदवार मिलिंद गवळी, पूजा पवार, गजेंद्र अहिरे, संजय पवार, अशोक जाधव उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा