कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण प्रश्न तापत चालला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी रविवार, १४ जुलै रोजी शिवप्रेमींना विशाळगडावर येण्याचे आवाहन केले असून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवर बहिष्कार टाकला. तर यानंतर आज रात्री सकल हिंदू समाजाच्या वतीने पुन्हा एकदा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना लक्ष्य करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाळगडावर पशु पक्षी हत्या बंदी लागू करण्यात आली असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांचे विधान दिशाभूल करणारे आहे. त्यांनी अशा प्रकारची मागणी कोठे केली होती. त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, असा प्रश्न उपस्थित करून विश्व हिंदू परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून समाजाला भ्रमित करण्याचा प्रयत्न का होत आहे, अशी विचारणा केली आहे. दरम्यान याबाबतच्या प्रसिद्ध पत्रकात अनेक मुद्दे संभाजीराजे यांना उद्देशून केले आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे हे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना रायगड हा ‘नो फ्लाईंग झोन ‘ असूनही त्यावर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. हेलीपॅडचा खर्च प्राधिकरणातून केला की कसा याचे स्पष्ट उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड प्राधिकरणअंतर्गत कोणत्या गडावर किती खर्च झाला हे जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्याचा हिशोब शिवभक्तांना कधी देणार आहात, अशी विचारणा कुंदन पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – लाडकी बहीण योजनेसाठी शिवसेनेचे कोल्हापुरात ५० शिबिरांचे आयोजन

हेही वाचा – विशाळगड अतिक्रमणांबाबत दिखाऊ प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार – संभाजीराजे छत्रपती

लोकप्रतिनिधी म्हणून गडावर केलेला खर्च हा शासनाच्या निधीतून केला जातो. सामान्य जनतेच्या करातून हा खर्च केला गेला आहे. तर आपल्या वैयक्तिक निधीतून गड किल्ल्यांवर किती खर्च केला आहे याची माहिती देण्याची मागणी केली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishalgad encroachment what is the political purpose of sambhaji raje question of the sakal hindu samaj in kolhapur ssb