एफआरपीच्या मागणीसाठीचे शेतकरी आंदोलन संपुष्टात आले असताना आता राज्यातील साखर कामगारांनी पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
साखर कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात कराराची मुदत संपून वीस महिने झाले तरीही अद्याप कोणताच ठोस निर्णय न झाल्याने साखर व जोडधंद्यात काम करणाऱ्या कामगारांत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या उद्रेकामुळे येत्या ३१ डिसेंबर अखेर कोणताच प्रभावी निर्णय न झाल्यास नवीन वर्षांच्या २ जानेवारीपासून संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी सोमवारी शिरोळ तालुक्यात दिला. पश्चिम महाराष्ट्रातील पंचगंगा, शरद, वारणा, दत्त, असुल्रे-पोल्रे व उदयसिंह साखर कारखाना येथे आज दिवसभरात गेट सभा घेण्यात येणार आहेत.
तात्यासाहेब काळे म्हणाले,‘‘महाराष्ट्रातील साखर व जोडधंद्यातील कामगार यांच्या वेतनवाढी संदर्भात त्रिपक्षीय कराराची मुदत ३१मार्च २०१४ रोजी  संपुष्टात आली आहे. त्यासाठी राज्य प्रतिनिधी मंडळाने दि.२४ फेब्रुवारी रोजीच्या पत्राने तत्कालीन मुख्यमंत्री, साखर संघाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक, सहकार मंत्री, कामगार मंत्री, साखर आयुक्त, कामगार आयुक्त यांना बदलाची नोटीस देऊन कराराची मुदत संपल्याचे कळविले आहे. साखर कामगारांच्या नवीन मागणीचा मसुदाही पाठविलेला आहे. तत्कालीन सरकारने कमिटी गठीत केली नाही व त्यानंतर सत्ता परिवर्तन झाल्याने नवीन सरकारने कमिटी गठीत करावी म्हणून प्रयत्न केले, त्यास अखेर दि.८ जुल रोजी सरकारने साखर कारखाना प्रसिध्दी, कामगार प्रतिनिधी व शासन यांची त्रिपक्षीय समिती गठीत करुन, कमिटी गठीत झाल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत नवीन मागण्यांच्या शिफारशी कराव्यात असे सूचित केले. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी साखर कामगारांच्या मागण्यांच्या सत्वर विचार करावा असे सूचित केले. दरम्यानच्या कालावधीत सहा महिन्यात कमिटीच्या तीन बठका होऊनसुध्दा या कमिटीचे वेळकाढूपणाचे धोरण, सत्तांतर यामुळे करार संपून वीस महिने झाले तरी या समितीकडून पगारवाढीबाबतचा कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. मुळातच या बैठकीसाठी अनेक मालक प्रतिनिधी गरहजर राहतात. म्हणजेच या कामगार प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात म्हणून, पुणे येथे ९ डिसेंबर रोजी सर्वव्यापी बठक झाली. या बठकीत सर्वानी व्यवस्थापनाच्या दबावास बळी न पडता येत्या ३१ डिसेंबर अखेर कोणताच प्रभावी निर्णय न झाल्यास २ जानेवारीपासून संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बठकीत सर्वानुमते दिला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कोषाध्यक्ष व श्री दत्त शिरोळचे कामगार संचालक रावसाहेब भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी कार्याध्यक्ष राऊसाहेब भोसले, उपाध्यक्ष नितीन बेनकर, वसंतदादा सांगलीचे श्रीकांत देसाई व प्रदीप िशदे, जवाहरचे सर्जेराव हळदकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी उपस्थित कामगारबंधूंनी, कामगार एकजुटीचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुच्र्या खाली करा अशा घोषणा दिल्या.
स्वर्गीय सारे पाटील यांची प्रकर्षाने जाणीव
राज्याचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी यापूर्वी झालेल्या पगारवाढीच्या करारासाठी कायमच आग्रही असणारे श्री दत्त समूहाचे संस्थापक डॉ.अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांनी दिलेल्या योगदानाचा दोन-तीन वेळा खास उल्लेख केला व तशी मागसे आज नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय सारे पाटील आज असते, तर हा प्रश्न दोन बठकीतच निकालात निघाला असता असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा