केर्ली गावातील शाहूकालीन मोती तलावाची जमीन लाटण्याच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यतील विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी तलावाच्या पाण्यातच आत्मक्लेष आंदोलन केले. या आंदोलनात दिलीप देसाई, इंद्रजित सावंत,  सचिन तोडकर, राजू खोत यांचेसह १०० हून अधिक गावकरी सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीनं कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् बनला. भविष्याचा वेध घेत महाराजांनी पाण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यातील एक म्हणजे कोल्हापूर नजीकच्या केर्ली गावातील मोती तलाव. मात्र हा तलाव नष्ट होतो की काय अशी भीती वाटू लागली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून भारत ओसवाल या बडय़ा बांधकाम व्यावसायिकाने तलावात भराव घालून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार लक्षात येताच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ग्रामस्थांनी तलावाच्या पाण्यातच आत्मक्लेष आंदोलन केले.   या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.