कोल्हापूर : इचलकरंजी साठी दूधगंगेतून सुळकुड पाणी देण्याला विरोधाची धार कायम ठेवत शिरोळ तालुक्यातील पाच गावे बंद ठेवून शुक्रवार, ११ रोजी दत्तवाड येथील गांधी चौक येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा आज देण्यात आला. सुळकुड पाणी योजनेला तीव्र विरोध असून त्वरित स्थगिती देण्यात यावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने तालुक्यातील नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, उद्यान पंडित गणपतराव पाटील, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कुरुंदवाड पोलीस स्टेशन, मंडळ अधिकारी आदींना निवेदन देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुधगंगा नदी गेल्या वर्षभरात ९ वेळा कोरडी पडली आहे. पाण्याअभावी नागरिकांचे हाल झाले. कष्टाने पिकवलेली शेतातील पिके वाळून आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे इचलकरंजीला दूधगंगेतूनच् पाणी दिले तर दूधगंगा नदी काठाची आणखी बिकट अवस्था होणार असल्याने ही योजना कार्यान्वित होऊ देणार नाही. त्यासाठी पाच गावे बंद ठेवून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दूधगंगा बचाव कृती समिती अध्यक्ष सरपंच चंद्रकांत कांबळे, उदय पाटील, बाबुराव पवार, अमित माने, मलगोंडा पाटील, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply stopped five villages of shirol taluka on friday against giving water to ichalkaranji ysh
Show comments