लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील विस्तारीकरणात जाणवणाऱ्या सर्व त्रुटी दूर करू, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

खासदार संजय मंडलिक यांनी मंगळवारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली . पुणे ते बेंगळुरूला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण विस्तारीकरणाच्या कामातील अनेक त्रुटी त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. गडकरी यानी पुणे-बेंगळुरू महामार्ग विस्तारीकरणात सर्व त्रुटी दूर करू याची ग्वाही मंडलिक यांना दिली. यावेळी तांत्रिक सल्लागार व पुल बांधकामातील तज्ञ बी.डी.थेंग ही उपस्थित होते. त्यांना या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी संबधिताना मार्गदर्शन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

आणखी वाचा-माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केल्याचा शेजाऱ्यांचा आरोप; सावकाराचा आरोप व्यक्तिद्वेशातून – राजेश क्षीरसागर

कागल पासून घुणकी पर्यत विस्तारीकरणाच्या कामातील अनेक त्रुटी सांगताना कागल, विकासवाडी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, उचगाव, नागाव, संभापूर, अंबप, किणी येथे उंच व रुंद उड्डाण पुलाची गरज आहे. या पुलांची कामे कॉलम वापरून करावे लागेल. पावसाळ्यात पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी बोगदे मोठे करणे महत्त्वाचे आहे, असे मुद्दे मंडलिक यांनी मांडले.

Story img Loader