कोल्हापूर : महाविकास आघाडीत १५ जागांवर मतभेद आहेत. ते मिटल्यावरच वंचित बहुजन आघाडी आघाडीत असणार की नाही ते ठरेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय न्याय हक्क निर्धार सभेच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर आज इचलकरंजीत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला किती जागा मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होतोय. पण १५ जागांबाबत महाविकास आघाडीत मतभेद असल्याने आम्हाला या भिजत घोंगड्याच्या निर्णयाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात असले की धर्म, जातीचे राजकारण यशस्वी होते. त्यामुळे एकास एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आमच्या बाजूने निर्णय न झाल्यास सर्व ४८ जागा स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. या निवडणुकीत एमआयएमबरोबर वंचित आघाडी जाणार नाही आणि या निवडणुकीत वंचित-भाजप अशीच खरी लढत होईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – कोल्हापूरच्या आखाड्यात निवडणुकीपूर्वीच खडाखडी सुरू

हेही वाचा – यंत्रमागाच्या वीज दर सवलतीची अंमलबजावणी सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले जात असले तरी इथेनॉल उत्पन्नाचा ऊसाच्या दरात समावेश केला तर किमान १०० रुपये वाढ होऊ शकते. शेतकरी नेते आणि सरकारही याबाबत बोलत नसल्याने लोकसभा निवडणुकीत इथेनॉल उत्पन्नाचा ऊस दरात समावेश करण्याची मागणी अजेंड्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What did prakash ambedkar say about the inclusion of the vanchit bahujan aghadi in the mahavikas aghadi ssb
Show comments