नितेश राणे यांचा टोला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नारायण राणे यांनी प्रवेश करावा इतका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी मोठा झाला, अशी उपहासात्मक टीका आमदार नितेश राणे यांनी शनिवारी येथे बोलताना केली. ‘राष्ट्रवादी’ला हा टोला लगावताना त्यांनी उलट त्या पक्षातीलच अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत आणि २०१९ पर्यंत याबाबतचा उलगडा होईल, अशी शक्यता वर्तवली.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नुकतीच नारायण राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट होण्यापूर्वीपासूनच राणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार याविषयीची चर्चा सुरू होती. याबाबत पवारांनी पत्रकारांशी बोलताना जरी मौन बाळगले असले तरी या भेटीनंतर राणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे आलेले नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना या प्रवेशाची शक्यता फेटाळून लावतानाच ‘राष्ट्रवादी’लाही टोला लगावला आहे.

राणे म्हणाले, की या अशा पक्ष प्रवेशाच्या चर्चा आपण ऐकतो आहे, पण हे चुकीचे आहे. खरेतर नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याने प्रवेश करावा इतका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा नाही.

उलट राष्ट्रवादीतीलच अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. आगामी  २०१९ च्या निवडणुकीपर्यंत याबाबतचा उलगडा होईल, अशी शक्यताही नितेश यांनी वर्तवली.