कोल्हापूर : राज्यातील मराठा आंदोलन, दसरा -दिवाळी सण अशा कारणामुळे काहींसे थंडावलेले इचलकरंजी पाणी प्रश्नाचे आंदोलन आता थंडीमध्ये पुन्हा तापले आहे. आज सायंकाळी झालेल्या एका बैठकीत इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेला जाहीर विरोध करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सोमवारी इचलकरंजी मधील आयजीएम हॉस्पिटल येथील सीटीस्कॅन व अतिदक्षता विभाग उद्घाटन समारंभासाठी येत असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येतील, असा कार्यक्रम इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
या निदर्शनामध्ये इचलकरंजी शहरातील नागरिकांनी प्रचंड संख्येने सहभागी होण्यासाठी सोमवारी १० वाजता अण्णा रामगोंडा शाळेनजीक भाजी मार्केट मैदानावर उपस्थित रहावे असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
आणखी वाचा-सातारा: खंडाळा पंचायत समितीला यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचा विसर
इचलकरंजी शहरासाठी सुळकुड पाणी योजना कार्यान्वित व्हावी या मागणीसाठी इचलकरंजी शहरांमध्ये सातत्याने आंदोलन सुरू आहे. तथापि इचलकरंजीच्या या मागणीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उघड व स्पष्ट विरोध केला आहे. त्याचबरोबर “रक्ताचे पाट वाहतील” अशी बेजबाबदार व चिथावणीखोर विधाने केली आहेत. त्यामुळे शहरातील सर्व चार लाख जनतेच्या मनामध्ये हसन मुश्रीफ यांच्या बद्दल तीव्र असंतोष आहे. शहराला पाणी देण्यास जे विरोध करतात, त्यांनी शहरात येऊच नये, ही शहरातील नागरिकांची स्पष्ट भावना उघडपणे बोलली जात आहे.
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १३ ऑक्टोबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण झाले. तथापि ११ सप्टेंबर नंतर आज अखेर गेल्या अडीच महिन्यात संबंधित लोक प्रतिनिधी व मंत्री यांचेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही याबद्दल शहरातील नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे.
आणखी वाचा-सातारा पोलीस अधीक्षकांची अशीही कर्तव्यदक्षता; महामार्गावर वाचवले दोघांचे जीव
इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये अजीतमामा जाधव, शशांक बावचकर, मदन कारंडे, पुंडलिक जाधव, रवींद्र माने, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे, नितीन जांभळे, राहुल खंजीरे, रीटा रॉड्रिग्युस, भाऊसाहेब आवळे, अभिजित पटवा, प्रसाद कुलकर्णी, अहमद मुजावर, विकास चौगुले, प्रताप पाटील, जाविद मोमीन, विजय जगताप, वसंत कोरवी, राजू आलासे उपस्थित होते.