अर्ज निकाली काढण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुरुवारी महिला कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडण्यात आले.काजल गणेश लोंढे ( नेमणूक महिला सहाय्य कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर , सरनोबतवाडी,ता.करवीर) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्यांचे घरगुती कारणावरून पत्नीच्या विरूद्ध महिला सहाय्य कक्ष कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज दिलेला होता. सदर अर्ज निकाली काढला होता. या अर्जाचे समजपत्र तक्रारदार  यांना देण्यासाठी देणेकामी आरोपी काजल लोंढे यांनी तक्रारदार यांचेकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली.सदरची लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वीकारल्याने त्याना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे,अशी माहिती पर्यवेक्षण सरदार नाळे,पोलीस  उपअधीक्षक यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman constable caught red handed while accepting bribe zws
Show comments