कोल्हापूर : कोल्हापूरातील दिन ऐतिहासिक वास्तूंना जोडणारी संरक्षक भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी जखमी झाली आहे. काही वाहनांची नासधूस झाली आहे.  खासबाग मैदान त्यालगत असलेले केशवराव भोसले नाट्यगृह या दोन्ही वारसाहक्क स्थळातील महत्वपूर्ण वास्तू आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह स्वच्छतागृहाला लागून असलेली खासबाग मैदानाची संरक्षण भिंत सायंकाळी कोसळली.

त्यामध्ये दोन महिला सापडल्या होत्या. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील अश्विनी आनंदा यादव (वय ४५, कसबा बावडा) या महिलेचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. संध्या प्रशांत तेली (वय ३० रा. वडणगे, ता करवीर) ही गंभीर जखमी झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलेर आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
walmart indian girl death
कॅनडात वॉलमार्टमधील वॉक इन ओव्हनमध्ये आढळला शीख तरुणीचा मृतदेह
pune Sinhagad Road police arrested innkeeper along with his accomplice who was walking around with pistol
कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोघे सराईत अटकेत, एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त
A dog was strangled and killed at an animal shelter Pune news
पिंपरी : सांभाळण्यासाठी दिलेल्या श्वानाला डांबून ठेवून ठार मारले
Shalimar express
नागपूर: शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरली, प्रवासी जखमी
dead body cantonment
पुणे : कटक मंडळाच्या रुग्णालयातील गच्चीवर मृतदेह सापडला
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल

कोल्हापूर महापालिकेवर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारती काढून घेण्यासाठी महापालिका प्रशासन मोहीम राबवत असते. पण स्वमालकीच्या ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्थेकडे लक्ष पुरवले जात नाही. या घटनेने दिव्याखालील अंधार अधोरेखित झाला आहे.