कोल्हापूर : इचलकरंजी येथील डीकेटीई शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दुग्ध जनावरांच्या तब्बेतीची माहिती देण्यासाठी स्मार्ट टॅग बनविला आहे. यामुळे जनावरांचे तापमान, प्राणवायू, हृदयाची कार्यक्षमता त्यांच्या हालचाली आजमावण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्त ठरणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील मैनुदीन मुल्ला, ओम पवार व सिददीक इचलकरंजे या विद्यार्थ्यांनी प्रा.व्ही.बी. सुतार यांच्या मागदर्शनाखाली शेतक-यांच्यासाठी ‘कॅटल हेल्थ मॉनिटरींग स्मार्ट टॅग ’हा अनोखा प्रकल्प विकसीत केलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत हा कृषीप्रधान देश असून येथील बहुसंख्य नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर अधारीत दुग्धव्यवसाय हा शेतक-यांचा कणा आहे. या व्यवसायात शेतक-यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जनावरांच्या चारा,पाणी पासून ते औषधें दवाखानापर्यंत ते वेळोवेळी बघत असतात. दुष्काळामुळे चारा पाण्याचे प्रश्‍न तसेच त्यांना आजार होणे व त्यामुळे दुग्ध उत्पादन कमी होणे अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड दयावे लागत आहे. या सर्वांवर उपाय म्हणून डीकेटीईच्या या विद्यार्थ्यांनी शेतक-यांशी चर्चा करुन जनावरांच्या तब्बेतीसाठी प्रकल्प बनविला आहे.

हेही वाचा : कोल्हापूर: आरटीओ कार्यालयाचा महसुल बुडवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

या अत्याधुनिक प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये इंटरनेट ऑफ थिंग अँण्ड क्लाउडबेसड डाटा लॉगिंगचा वापर केला आहे. या प्रकल्पामध्ये जनावरांच्यासाठी एक संक्षिप्त स्मार्ट टॅग बनविला आहे. जो जनावरांच्या कानांमध्ये बसवता येईल. त्यामुळे जनावरांची हलचाल, प्राणवायू आणि त्यांच्या हृदयाची कार्यता व तापमान हे सर्व घटक शेतकऱ्यांना कोठूनही मोबाईलवर पाहता येणार आहेत. पूर्वसूचना मिळाल्याने संभाव्य अजारपणापासून जनावरांना वाचवता येईल. या घटकांचे मोजमाप करुन जर काही कठीण बाब असेल तर ही कार्यप्रणाली अलार्म व लाईट मार्फत संदेश पाठवते. वरील सर्व घटक इंटरनेट कार्यप्रणाली मुळे क्लाउड सर्व्हरवर स्टोअर होत असल्यामुळे मागील काही दिवसातील, महिन्यातील या वर्षातील जनावरांचा डेटा पाहता येतो. ज्यामुळे त्यांचे सर्व्हेक्षण व देखरेख करणे सोपे जाते. सौर ऊर्जा आणि बॅटरीवर काम करणारी प्रणाली असून बॅटरी चार्जिंगसाठी बाहेर काढण्याची गरज नाही.

हेही वाचा : आधी केले मग सांगितले! महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून

डीकेटीईचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण व समाजउपयोगी प्रकल्प विकसीत करीत असतात हा प्रकल्प देखील शेतक-यांचा हिताचा आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.ए.पाटील यांचे सहकार्य लाभले.