शाळेच्या बसची धडक बसल्याने युवक जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर झाला. विशाल शामराव पाटील, वय २८, रा. मोहरे, ता. पन्हाळा असे मृत युवकाचे नाव आहे. जमावाने जयपाल मगदूम शाळेच्या बसची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. या गोंधळात बस चालक पळून गेला.
विशाल पाटील हा युवक दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होता. तर जयपाल मगदूम शाळेची बस पन्हाळ्याच्या दिशेने जात होती. तिसऱ्या वळणाजवळ बस पोहचली असता तिची पाटील याच्या दुचाकीस जोरदार धडक बसली. यामुळे विशाल दुचाकीवरून फेकला गेला. त्याचे डोके बसच्या चाकात अडकले. चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा चेंदामेंदा झाला. यात विशाल जागीच ठार झाला. अपघात झाल्याचे पाहून तेथे जमलेल्या लोकांनी जयपाल मगदूम शाळेच्या बसची नासधूस सुरु केली. बसच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. प्रवासी सीट फाडण्यात आल्या. हा गोंधळ सुरू असल्याचा फायदा उठवत बसचा चालक पळून गेला. या मार्गावरील वाहतूक या प्रकारामुळे काही काळ बंद ठेवावी लागली .
शाळेच्या बसची धडक बसल्याने तरुण ठार
कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अपघात
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 03-03-2016 at 03:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young killed collision of school bus