कोल्हापूर : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इचलकरंजी येथे शुक्रवारी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक निवास चव्हाण (रा. कोरोची) असे संशयिताचे नांव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयित विनायक चव्हाण याने पिडीत मुलीला कॉलेजला सोडण्यासाठी म्हणून मोटरसायकलवर घेतले. परंतु तिला कॉलेजला न सोडता तिला कोल्हापूर रोडवरील नंदनवन या लॉजवर नेले. त्याठिकाणी तिच्याशी लगट करत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझे काही खरे नाही, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.