क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. त्यात टी २० क्रिकेट म्हटलं की कधी काय घडेल याचा अंदाज बांधता येत नाही. टी २० सामना इतका जलद असतो की सामना कधीही फिरू शकतो. टी २० सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. पण नुकतीच टी २० क्रिकेटमध्ये एक धमाकेदार गोष्ट घडली. टी २० क्रिकेटच्या इतिहासात २४ तासांमध्ये तब्बल ३ हॅटट्रिक पाहायला मिळाल्या. २४ तासांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये २ तर सुपर स्मॅश लीगमध्ये एका हॅटट्रिकची नोंद झाली.

T20 World Cup 2020 : धोनीला स्थान नाही; शुभमन गिल संघात

२०२० या वर्षातील पहिल्या हॅटट्रिकचा मान अफगाणिस्तानच्या रशीद खानने पटकावला. त्या पाठोपाठ दुसऱ्याच सामन्यात पाकिस्तानच्या हॅरिस रौफने हॅट्रिक घेतली. तर पुढील दिवशी, पण पहिल्या हॅटट्रिकला २४ तास होण्याच्या आत न्यूझीलंडच्या विल विल्यम्सने हॅटट्रिक घेतली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सुपर स्मॅश लीगमध्ये त्याने हॅटट्रिक नोंदवली.

‘कॉफी विथ करण’ प्रकरणावर हार्दिकने अखेर सोडलं मौन, म्हणाला…

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळताना रशीद खानने सिडनी सिक्सर्स विरुद्ध हॅटट्रिक घेतली. रशिदने जेम्स विन्स, जॅक एडवर्ड्स आणि जॉर्डन सिल्क यांना सलग तीन चेंडूवर बाद केले.

IND vs AUS : भारताला भारतातच हरवू – अ‍ॅरोन फिंच

पाहा व्हिडीओ –

रशिदच्या हॅटट्रिकनंतर मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील लढीतीत हॅरिस रौफने हॅटट्रिक नोंदवली. दमदार लयीत गोलंदाजी करणाऱ्या हॅरिस रौफने हॅटट्रिक टिपली. त्याने थंडर्सच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

THE MCG IS ROCKING! Haris Rauf takes a hat-trick, can you believe it?! #BBL09

A post shared by KFC Big Bash League (@bbl) on

त्यानंतर सुपर स्मॅश लीगमध्ये कँटरबरी संघाचे प्रतिनिधित्व करताना विल विल्यम्सने हॅटट्रिक घेतली. प्रतिस्पर्धी संघाचे पाच फलंदाज शिल्लक होते. त्यावेळी विल्यम्सने सामना फिरवला. त्याने १८ व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर वेलिंग्टनच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले.

हा पाहा व्हिडीओ –

वेलिंग्टन संघाविरुद्धची ही लढत कँटरबरी संघाने अगदी मोक्याच्या क्षणी अवघ्या ३ धावांनी जिंकली. कँटरबरीने ८ बाद १४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेलिंग्टन संघाला १८ चेंडूंत २३ धावांची गरज होती. पण त्यांना केवळ १४५ धावाच करता आल्या.