माजी क्रिकेटपटू अमित पागनीसकडे २०२०-२१ क्रिकेट हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रशिक्षकपदाचा तिढा अखेरीस गुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) सोडवला. ४२ वर्षीय पागनीसने मुंबई, रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ९५ सामन्यांत ५८५१ धावा केल्या आहेत.
‘‘अमित पागनीसची ‘एमसीए’च्या क्रिकेट सुधारणा समितीने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुंबईच्या वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती केली आहे,’’ अशी माहिती ‘एमसीए’चे सचिव संजय नाईक यांनी दिली.