२०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला गटाने रिले स्पर्धेत सुवर्णपदक कमावले. हिम दास, पूवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया कोरोथ या चार जणींच्या संघाने भारताला या स्पर्धेतील १३वे सुवर्ण पदक मिळवून दिले. ४ x ४०० मीटर रिले प्रकारात भारतीय महिलांनी ही सोनेरी कामगिरी केली.

भारताचे हे दिवसातील दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी भारताच्या जीन्सन जॉन्सनने १५०० मीटर प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते.