वेस्ट इंडिजचा सलामीवीर आणि तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल हा मैदानावर कायम आक्रमक असतो. पण त्याला संतापलेल्या अवस्थेत फार कमी पाहण्यात आले आहे. कितीही काहीही झालं तरी तो सहसा हसून मैदानावरील वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण नुकतेच एका प्रकरणा दरम्यान ख्रिस गेलचा राग अनावर झाल्याचे दिसून आले. आपल्या यू ट्युब चॅनेलवरून ख्रिस गेलने त्याच्या माजी सहकाऱ्यावर टीकास्त्र सोडले. कॅरेबियन प्रिमीयर लीग स्पर्धेत गेल अनेक वर्षे जमैका तल्हायवाज संघाकडून खेळत होता, पण यंदा त्याला तल्हायवाज संघाने सोडचिठ्ठी दिली आणि तो सेंट ल्युसिया झोक्स संघात दाखल झाला.

“आता पश्चात्ताप करण्यावाचून हाती काही उरलं नाही”

जमैका तल्हायवाज संघातून गेलला काढण्याचा डाव त्याचा माजी सहकारी रामनरेश सरवान याचाच होता असा दावा गेलने केला आहे. तल्हायवाज संघाच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचे सरवानने कान भरले आणि परिणामी गेलला संघाबाहेर व्हावे लागले, असा आरोप गेलने केला. गेलचा राग अनवार झाल्याने त्याने सरवानला ‘सापा’ची उपमा दिली. तसेच लोकांच्या पाठीत सुरा खुपसणं कधी बंद करणार असा सवालही ख्रिस गेलने त्याला केला.

विराटवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही – डीव्हिलियर्स

“सध्याच्या घडीला, सरवान, तू करोना व्हायरसपेक्षाही घातक आहेस. तल्हायवाज संघात काय घडलं याची मला चांगलीच कल्पना आहे. कारण त्या संघात तुझ्या मताला खूप किंमत आहे. तुझं तल्हायवाज संघाच्या मालकांशी अगदी घट्टा नातं आहे, याची साऱ्यांनाच कल्पना आहे. आपण दोघं मित्र आहोत असं तू नेहमी म्हणतोस पण मी केलेला साधा फोनही तू उचलत नाहीस. माझ्या मागच्या वाढदिवशी जमैकामध्ये तूच आपल्या संघाबाबत आणि माझ्याबाबत स्टेजवर चढून चांगलं बोलला होतास. पण सरवान, तू साप आहेस हे आता मला कळून चुकलं आहे. तु अजूनही लहान मुलांसारखा अपरिपक्व आहेस. तू अजूनही लोकांच्या पाठीत सुरा खुपसतो आहेस. तू ही गोष्ट कधी बंद करणार आहेस?”, या शब्दात ख्रिस गेलने आपला संताप व्यक्त केला.