CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींपासून ते प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री तसेच इतर जबाबदार मंत्री नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत.

Coronavirus : क्रीडाविश्वात हळहळ! वडिलांपाठोपाठ दिग्गज क्रीडापटूचेही उपचारादम्यान निधन

भारताचा दमदार सलामीवीर रोहित शर्मा या आवाहनाचे काटेकोर पालन करताना दिसतो आहे. त्याने लॉकडाउन काळात त्याच्या जीवनाचा फंडा शोधून काढला आहे. त्याने बूटाची लेस बांधतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने घरी राहा, तंदुरूस्त राहा, घराबाहेर पडू नका, निरोगी आणि सुरक्षित राहा असा संदेशदेखील रोहितने दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Being homebound is no excuse, stay fit, stay in, stay safe

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

“… तर IPL खेळण्यात काय अर्थ आहे”

दरम्यान, करोनाचा फैलाव वाढत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहे.

योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. म्हणूनच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला टीम इंडियाचा मुंबईकर सलामीवीर रोहित शर्मा पुढे सरसावला. रोहितने प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये ४५ लाख, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २५ लाख, ‘फिडिंग इंडिया’साठी ५ लाख तर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या देखभालीसाठी ५ लाख अशी एकूण ८० लाखांची आर्थिक मदत केली आहे.