क्रिकेट या खेळात कायम खेळाडूची गुणवत्ता पाहिली जाते. पण पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूला सापत्न वागणूक दिली गेल्याचा गौप्यस्फोट एका खेळाडूने केला आहे. पाकिस्तानच्या संघात खेळताना एका खेळाडूला तो केवळ हिंदू आहे म्हणून वाईट वागणूक दिली जात होती, असा गौप्यस्फोट रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने केला आहे.

…म्हणून त्याने धवनला मारल्या लाथा, चूक लक्षात येताच मागितली माफी

भारतामध्ये जसे मुस्लीम धर्माचे लोकं राहतात, तसेच पाकिस्तानमध्येही काही हिंदूधर्मीय लोक राहतात. पण पाकिस्तानमधील हिंदू लोकांवर कायम अन्याय केला जातो, असे म्हटले जाते. आता खुद्द पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनेच याबाबत मोठे विधान केले आहे. पाकिस्तानच्या संघात हिंदू खेळाडूंना वाईट वागणूक दिली जाते, असे त्याने सांगितले आहे. एका टीव्ही शो मध्ये अख्तरने सांगितले की पाकिस्तानच्या संघात बरेच हेवे-दावे केले जातात. पाकिस्तानच्या संघात गुणवत्ता आणि कामगिरी या गोष्टींपेक्षाही जास्त महत्त्व इतर काही गोष्टींना दिले जाते. या गोष्टींसाठी पाकिस्तानचे खेळाडू हाणामारी करायलाही कमी करत नाहीत.

Video : हा विचित्र प्रकारचा बोल्ड पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू…

दानिश कनेरिया

 

“पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हा हिंदू खेळाडू होता. तो हिंदू आहे, म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला. त्याने संघासाठी अनेक विजय मिळवून दिले. सामने आणि मालिकाही जिंकवून दिल्या. पण तरीही त्याला आपल्याबरोबर जेवताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंना रुचायचे नाही. काहींची तर त्याला मारण्यापर्यंतही मजल गेली होती. अखेर त्या हिंदू खेळाडूने लवकर कारकिर्द संपवली, नाही तर त्याने जास्त काळ संघात राहून पाकिस्तानला विजय मिळवून दिले असते”, असे शोएब अख्तरने स्पष्ट केले.