काही दिवसांपूर्वी बांगलागदेशचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनचे ढाका प्रीमियर लीगमधील (डीपीएल २०२१) गैरवर्तन समोर आले होते. आता याच लीगमध्ये अजून एक संकट उभे राहिले आहे. या लीगमधील अधिकाऱ्यांवर कामगारांनी हल्ला केला आहे. कापड मजूर आणि पोलिसांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणानंतर पंच आणि अधिकारी सामन्याच्या ठिकाणी पोहचले. त्यामुळे सामना अर्धा तास उशीरा सुरू झाला.

हेही वाचा – टीम इंडियासाठी धोक्याची घंटा..! न्यूझीलंडने इंग्लंडमध्ये जिंकली कसोटी मालिका

शाकिब अल हसनच्या त्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा डीपीएल चर्चेत आले आहे. कापड मजूर आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादात शैफुद्दीन अब्दुल्ला, अल मोतीन, तन्वीर अहमद, इमरान परवेज, सोहराब हुसेन, बराकतुल्लाह तुर्की, आदिल अहमद आणि देवब्रत पॉल हे आठ अधिकारी जखमी झाले. या हल्ल्यात त्यांच्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. या अधिकाऱ्यांना जवळपास २० मिनिटे अडवून ठेवण्यात आले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

हेही वाचा – भारताचा ‘जावई’ असलेल्या क्रिकेटपटूची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार

शाकिब अल हसनचे गैरवर्तन आणि माफी

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला डीपीएल लीगमध्ये मैदानात केलेले कृत्य चांगलेच महाग पडले आहे. एका सामन्यादरम्यान त्याने स्टम्पवर लाथ मारली होती. तसेच पंचावर धावून गेला होता. या कृत्यामुळे त्याच्यावर लीगमधील चार सामने खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय, त्याला ५ लाखांचा दंडही आकारण्यात आला. ढाका मेट्रोपोलिस क्रिकेट समितीने ही कारवाई केली आहे. यापूर्वी शाकिबने त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली होती.