आशियाई चॅम्पियनशिपमधील व्हॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या जिम्नॅस्ट प्रणती नायकने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने (एफआयजी) अधिकृतपणे याची घोषणा केली. मे महिन्यात होणारी आशिया चॅम्पियनशिप करोनामुळे रद्द झाली होती. त्यानंतर प्रणतीला स्थानांतरणाच्या आधारे कोटा मिळाला.

प्रणतीचे प्रशिक्षक लखन शर्मा यांनी सांगितले, “आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने  प्रणतीला कॉन्टिनेंटल कोटा मिळाल्याचे सांगितले. सोमवारी संध्याकाळी ही बातमी आम्हाला कळली.” कोलकाता येथील २६ वर्षीय प्रणतीने मंगोलियामध्ये झालेल्या २०१९च्या आशियाई चॅम्पियनशिपमधील व्हॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

 

 

हेही वाचा – विजेतेपद जिंकलं आणि मनही..! WTC FINALमध्ये घातलेली जर्सी साऊदीनं काढली लिलावात

शर्मा म्हणाले, “प्रणतीने २०१२च्या आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. करोनामुळे २०२० मधील बर्‍याच स्पर्धांवर परिणाम झाला होता.