न्यूझीलंड संघाने नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दौऱ्यातील दुसरा व्हाईटवॉश दिला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला. या पराभवानंतर नेटिझन्स भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर प्रचंड भडकल्याचे दिसून आले. तशातच भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेही रवी शास्त्री आणि निवड समिती यांच्यावर टीकास्त्र सोडले.

T20 World Cup : सामना न खेळूनही टीम इंडियाने घडवला इतिहास

“वृद्धिमान साहाला कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नाही. त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. साहाला संघातून का वगळण्यात आला हे मला कळतंच नाहीये. पंतचा फॉर्म गेल्या काही सामन्यात चिंतेचा विषय होता. सराव सामन्यातदेखील त्याने चांगली खेळी केली नव्हती. अशा परिस्थितीत पंतला संघात घेण्याची बुद्धी कोणाला झाली?” असा संतप्त सवाल हरभजनने केला. क्रिकेट अ‍ॅडिक्टरने हे वृत्त दिले. याशिवाय त्याने अजिंक्य रहाणेवरही टीका केली. अजिंक्यने न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत खराब फलंदाजी केली. आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याला खेळता येत नाही हे साऱ्या जगाने पाहिले. त्यामुळे आता त्याच्या उणीवा साऱ्यांना समजल्या आहेत, असेही तो म्हणाला.

Video : …म्हणून साडी नेसून क्रिकेटच्या मैदानात उतरली मिताली राज

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांचा पहिला डाव काहीसा बरोबरीत सुटल्यानंतर भारताचा दुसरा डाव न्यूझीलंडने १२४ धावांत गुंडाळला. दुसऱ्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशीही खराब सुरुवात झाली. हनुमा विहारी, ऋषभ पंत, मोहम्मद शमी हे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतले. रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. भारताचा दुसरा डाव १२४ धावांमध्ये आटोपला.

T20 World Cup : ‘सामना खेळू न देताच वर्ल्ड कपमधून बाहेर कसं काढता?’

न्यूझीलंडला विजयासाठी मिळालेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लॅथम आणि ब्लंडल या सलामी जोडीने दमदार खेळ केला. लॅथमने ५२ तर ब्लंडलने ५५ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.