भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णाध्याय लिहिला. सुवर्णयशाचा ‘भालेदार’ २३ वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने एकंदरीतच इतिहास घडवला. भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या १०० वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात आतापर्यंत मिल्खा सिंग आणि पी. टी. उषा यांच्या शतांश सेकंदाच्या फरकाने हुकलेल्या पदकांची उणीव भासायची; पण नीरजच्या पदकाने हा दुष्काळ संपवला. नीरजच्या या कामगिरीनंतर त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळी माहिती समोर येत असतानाच त्याच्यावर भारत सरकारने किती खर्च केला यासंदर्भातील माहितीही समोर आली आहे.

नक्की वाचा >> टोक्योला जाण्यापूर्वीच बहिणीचा मृत्यू, आईने लपवून ठेवली बातमी; मायदेशी परतल्यानंतर ‘ती’ विमानतळावरच ढसाढसा रडली

२०१६ साली इंटरनॅशनल अमॅच्यूअर अ‍ॅथलेटीक फेड्रेशन म्हणजेच आयएएफने आयोजित केलेल्या स्पर्धेत नीरजने जागतिक विक्रम केला तेव्हा तो पहिल्यांचा प्रकाशझोतात आलं. त्याने पहिल्या प्रयत्नात केलेल्या ८६.४८ मीटरच्या प्रयत्नामध्ये त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये २०१६ सालीच कांस्यपदक मिळालं असतं. मात्र जेव्हा ही तरुण खेळाडूंची स्पर्धा झाली तेव्हा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवण्याचा कालावधी उलटून गेल्याने नीरजला पाच वर्षे वाट पहावी लागली. या पाच वर्षांमध्ये भारत सरकारच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम या योजनेअंतर्गत तसेच खासगी प्रायोजक जीएसडब्लूच्या माध्यमातून नीरजला आर्थिक मदत करण्यात आली. नीरजच्या प्रशिक्षणासाठी आणि ऑलिम्पिक तयारीसाठी भारत सरकारने किती खर्च केला पाहुयात.

नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”

प्रशिक्षकांचा पगार किती?

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साइ) माहितीनुसार नीरजच्या कोपरावर २०१९ साली मुंबईमध्ये महत्वाची शस्त्रक्रीया पार पडली. त्यानंतर डॉक्टर कॅल्स बार्टोनिट्स यांना नीरजचे खासगी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं. यासाठी सरकारने त्यांना पगाराच्या स्वरुपात १ कोटी २२ लाख २४ हजार ८८० रुपये दिले आहेत.

नक्की वाचा >> ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज मराठ्यांचा वंशज; पूर्वज लढले होते पानिपतच्या युद्धात

भाल्यांची किंमत आणि २०२१ मधील एकूण खर्च किती?

तसेच नीजरसाठी एकूण चार भाले विकत घेण्यात आले. त्याची एकूण किंमत ४ लाख ३५ हजार रुपये इतकी असल्याचं ‘साइ’ने सांगितलं आहे. याच वर्षी नीरजवर १९ ला २२ हजार ५३३ रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्वीडनमध्ये ५० दिवसांसाठी तो युरोपियन स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. तिथून तो थेट टोक्योला रवाना झाला होता. नीरजवरील या खर्चासंदर्भातील माहिती क्वीट या वेबसाईने प्रकाशित केलेल्या वृत्तात दिलेली आहे.

एकूण खर्च किती?

भारत सरकारने नीजरच्या प्रशिक्षणासाठी ४ कोटी ८५ लाख ३९ हजार ६३८ रुपये खर्च केले आहे. हा सर्व निधी नीरजचं प्रशिक्षण, परदेशात झालेल्या स्पर्धा अशा सर्व ४५० दिवसांचा खर्च असल्याचं ‘साइ’कडून सांगण्यात आलं आहे.

नक्की पाहा >> जन गण मन… १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये वाजलं भारताचं राष्ट्रगीत; Video पाहताच अंगावर काटा येईल

नीरजवर बक्षीसांचा पाऊस

ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे. नीरजला आतापर्यंत जाहीर झालेली बक्षिसं खालील प्रमाणे आहेत.

’बीसीसीआय’ – १ कोटी

चेन्नई सुपर किंग्ज – १ कोटी

एलन रिअ‍ॅल्टी ग्रुप – २५ लाख

इंडिगो कंपनी – पुढील वर्षभरासाठी मोफत विमानप्रवास

महिंद्रा ग्रुप – एक्सयूव्ही ७०० आलिशान गाडी

‘बैजू’ कंपनी – २ कोटी

पंजाब सरकार – २ कोटी

नक्की पाहा हे फोटो >> …अन् गोल्ड मेडल नीरजच्या गळ्यात; डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावेत असे ‘सुवर्ण’क्षण

हरयाणा सरकारकडून बक्षिसांचा पाऊस…

पंचकुला येथील अ‍ॅथलेटिक्स केंद्राचा प्रमुख

शासकीय विभागात प्रथम श्रेणी अधिकारी पदावर नोकरी

हरयाणामध्ये सवलतीच्या दरात जमीन

हरयाणा सरकार – ६ कोटी